

तबल्यावर आपल्या बोटांनी आणि हातांनी संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या पद्मश्री उस्ताद झाकीर हुसैन यांचा आज ६८ वा वाढदिवस. उस्ताद झाकीर यांची ओळख करून द्यायची म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखेच आहे.


झाकीर हे तबला उस्ताद ‘अल्ला रख्खा’ यांचे पूत्र. अल्ला रख्खा हे महाराष्ट्रातले असल्यामुळे झाकीर यांचं बालपण मुंबईत गेलं. झाकीर यांचं पूर्ण नाव झाकीर हुसैन कुरेशी असं आहे.


वयाच्या तिसऱ्या वर्षापासून झाकीर यांनी वडिलांकडे पखवाज शिकायला सुरुवात केली. अल्ला रख्खा त्यांना पहाटे ३ वाजता उठवून रियाज करून घ्यायचे. वयाच्या सातव्या वर्षी झाकीर यांनी पहिला परफॉर्मन्स दिला.


वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात आपल्या तबल्याचा आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करायला सुरुवात केली.


झाकीर हे बिल लाउ वैलचे ग्लोबल म्युझिक सुपरग्रुपचे तबला बीट साईंसचे संस्थापक सदस्य आहेत. हिट अँड डस्ट आणि साज या सिनेमांशिवाय अनेक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं आहे.