Home » photogallery » entertainment » HAPPY BIRTHDAY SIDHARTH MALHOTRA CELEBRATING HIS 36TH BIRTHDAY TODAY CHECK OUT HIS SHIRTLESS PHOTOS AND HIS BOLLYWOOD JOURNEY GH
Happy Birthday Sidharth Malhotra: मॉडेल ते अभिनेता... सिद्धार्थचा बॉलिवूड प्रवास
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
|
1/ 10
स्टुडंट ऑफ द इयर (Student of the Year) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज 36वा वाढदिवस साजरा करत आहे. (Image: Instagram)
2/ 10
वयाच्या 18व्या वर्षी सिद्धार्थने करिअरला सुरुवात केली होती. मॉडेलिंगच्या माध्यमातून त्याने अभिनयाच्या क्षेत्रात डेब्यू केला होता. (Image: Instagram)
3/ 10
त्याने मॉडेलिंगनंतर करण जोहरच्या माय नेम इज खान (My Name is Khan) या चित्रपटातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात केली. (Image: Instagram)
4/ 10
सिद्धार्थने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. (Image: Instagram)
5/ 10
या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट मेल बेब्युटन्ट पुरस्कार मिळाला होता. (Image: Instagram)
6/ 10
कारकिर्दीत त्याने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. हसी ती फसी, एक व्हिलन, कपूर अँड सन्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. (Image: Instagram)
7/ 10
याचबरोबर बार बार देखो, अय्यारी आणि जबरिया जोडी यांसारख्या काही चित्रपटांमध्येही त्याने जबरदस्त भूमिका केल्या आहेत. (Image: Instagram)
8/ 10
नुकताच तो मरजावा (Marjaavaan) या चित्रपटात दिसला होता. (Image: Instagram)
9/ 10
शेरशाह (Shershaah), थँक गॉड (Thank God) आणि मिशन मजनू (Mission Majnu) या आगामी चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Image: Instagram)
10/ 10
मोस्ट डिजायरेबल मॅन, भारतीय सिनेमाच्या 100 वर्षांत सर्वात हँड्सम हंक ऑफ इंडियन सिनेमा यांसारखे अनेक पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्राने मिळवले आहेत. याचबरोबर मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर पुरस्कारही सिद्धार्थला मिळाला आहे. (Image: Instagram)