Happy Birthday Rajinikanth: बस कंडक्टर ते 'थलायवा', असा आहे रजनीकांत यांचा जीवनप्रवास
Happy Birthday Rajinikanth: रजनीकांत यांचा आज 70 वा वाढदिवस आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो-करोडो चाहते ट्विटरवर त्यांचा CDP अर्थात कॉमन डिस्प्ले पिक्चर शेअर करत आहेत.


सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. 12 डिसेंबर 1950 ला बेंगळुरूमध्ये त्यांचा जन्म झाला. कष्टाच्या बळावर त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे. त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त CDP म्हणजे कॉमन डिस्प्ले पिक्चर व्हायरल केलं आहे. एआर रेहमान सारख्या दिग्गजांनी देखील ही पोस्ट शेअर केली आहे. (फोटो: सोशल मीडिया)


रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड असून त्यांच्या आईचं ते लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर त्यांचं बालपण खूप हालाखीत गेलं. (फोटो: सोशल मीडिया)


घर चालवायची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर येऊन पडली. उदरनिर्वाहासाठी रजनीकांत यांनी हमाल म्हणूनही काम केलं होतं (फोटो: सोशल मीडिया)


हे खूप कमी जणांना माहिती आहे की रजनीकांत पहिल्यांदा बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करायचे. चित्रपटांत काम करावं हे त्यांच बालपणीचं स्वप्न होतं. (फोटो: सोशल मीडिया)


रजनीकांत यांनी कन्नड नाटकांतून अभिनय करायला सुरुवात केली. या रंगभूमीवरील महाभारताच्या कथेवर आधारित नाटकात त्यांनी केलेल्या दुर्योधनाच्या भूमिकेचं खूप कौतुक व्हायचं. (फोटो: सोशल मीडिया)


तमिळ चित्रपटात पाऊल टाकण्याआधी रजनीकांत तमिळ भाषा शिकले होते. अपूर्वा रागनगाल या चित्रपटातून त्यांनी चित्रसृष्टीत पदार्पण केलं. याच चित्रपटात कमल हसन यांनीही काम केलं होतं. (फोटो: सोशल मीडिया)


बिल्ला या चित्रपटामुळे रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा मोठं यश मिळालं. रजनीकांत यांच्या या बिल्लाचाच रिमेक 1978 मध्ये हिंदीत डॉन या नावाने आला. या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती अमिताभ बच्चन यांनी आणि या चित्रपटामुळे अमिताभ यांनाही अफाट यश मिळालं. (फोटो: सोशल मीडिया)


रजनीकांत यांनी मुंदरू मूगम या चित्रपटात पहिल्यांदा ट्रिपल रोल केला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी तमिळनाडू सरकारनी त्यांना बेस्ट अक्टरचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. (फोटो: सोशल मीडिया)


रजनीकांत यांनी हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता अंधा कानून. यात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, हेमामालिनी, रीना रॉय यांनीही काम केलं होतं. हम चित्रपटातही अमिताभ आणि रजनीकांत यांनी एकत्र काम केलं आहे. (फोटो: सोशल मीडिया)


रजनीकांत यांनी तमिळ आणि हिंदीसोबतच मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि बंगाली भाषेतही काम केलं आहे. भाग्य देबता या बंगाली चित्रपटात रजनीकांत यांची भूमिका होती. (फोटो: सोशल मीडिया)


रजनीकांत यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. (फोटो: सोशल मीडिया)