करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाना पाटेकरांनी गमन नावाच्या एका सिनेमातून एका छोट्याच्या भूमिकेतून करिअरची सुरूवात केली होती.त्यांना खरी ओळखी एन चंद्रा यांच्या अंकुश आणि विधू विनोद चोप्रा यांच्या परिंदा सिनेमामुळे मिळाली होती. 1991 मध्ये प्रदर्शित झालेला क्रांतीवीर हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी 'यशवंत', 'वजूद', 'युगपुरुष', 'गुलाम-ए-मुस्तफा' सारख्या अनेक भूमिकांमध्ये हिरोची भूमिका साकारली. 'खामोशी', 'यशवंत', 'अब तक छप्पन', 'अपहरण', 'वेलकम' आणि 'राजनीति' या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.