मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांनी आजवर त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पाहा मृणाल यांचा थक्क करणार प्रवास.
2/ 9
मृणाल यांचा जन्म २१ जून १९६८ ला पुण्यात झाला होता. मृणाल यांचे वडिल डॉक्टर होते. तर त्यांचं माहेरचं नाव मृणाल देव असं आहे. त्यांना मधुरा नावाची लहाण बहीण देखील आहे.
3/ 9
मृणाल यांचं शिक्षणही पुण्यातच झालं. त्यांनी लिंग्विस्टीक्समध्ये मास्टर्स केलं आहे. पण त्यांना अभिनयातच रस होता.
4/ 9
मृणाल यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. स्वामी या मालिकेत त्यांनी पेशवे रमाबाई हे पात्र साकारलं होतं.
5/ 9
यानंतर मृणाल यांच्या अभिनय कौशल्याने त्यांनी अनेक अवघड अशा व्यक्तिरेखा साकारल्या. 'सोनपरी' ही प्रचंड लोकप्रिय झालेली मालिकाही त्यांनी केली. आजही सोनपरीचे लाखो चाहते आहेत.
6/ 9
1990 साली त्यांनी त्यांचा बालपणीचा मित्र रुचिर कुलकर्णी यांच्याशी विवाह केला. त्यानंतरही त्यांच काम मात्र सुरूचं होतं. रुचिर हे चित्रपटसृष्टीत नाहीत.
7/ 9
विराजस कुलकर्णी हा मृणाल यांचा मुलगा आहे. मराठी मालिकांमधून त्यानेही मोठी ओळख मिळवली आहे.
8/ 9
यानंतर दौपदी, अहिल्याबाई होळकर, पेशवीन रमाबाई, जिजाबाई अशा दमदार भूमिका मृणाल यांनी साकारल्या. तर प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
9/ 9
अभिनयाइतक्याच त्या सौंदर्यवतीही आहेत. त्यांच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत. लवकरच मृणाल 'पावनखिंड' या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहेत.