HBD: पहिल्याच मालिकेत ठरली होती सुपरहिट; पाहा मृणाल कशी बनली लोकप्रिय अभिनेत्री
मराठी टेलिव्हिझनवरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी.
|
1/ 11
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री मृणाल दुसानिसने पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पाहा मृणालचा अभिनय प्रवास कसा होता.
2/ 11
मृणालने तिच्या अभिनयाने , सौंदर्याने प्रेक्षकवर्गावर मोठी जादू केली. मृणालचा जन्म 20 जून 1988 ला नाशिकमध्ये झाला होता.
3/ 11
तिचं शालेय शिक्षणही नाशिकमध्येचं झालं. तिने मास्टर्स इन जर्नलिझम ही पदवी देखील घेतली होती. पण अभिनयातील आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती.
4/ 11
अभिनयाची आवड असल्याने ती कॉलेज जीवनापासूनच नाटकांत सहभागी व्हायची.
5/ 11
मृणालला 2010 साली 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या झी मराठीवरील मालिकेत पहिला ब्रेक मिळाला होता.
6/ 11
अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत तिची जोडी सुपरहिट ठरली होती. तर मालिकेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर मृणालला खरी ओळखही मिळाली.
7/ 11
त्यानंतर मृणाल काही कार्यक्रमांमध्येही दिसली. तर 2015 साली ती 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेत दिसली. अभिनेता संतोष जुवेकरसोबत ही मालिका देखील लोकप्रिय झाली होती.
8/ 11
2016 साली मृणालने निरज मोरे याच्याशी लग्न केलं. तो सॉफ्टवेअर इंजीनिअर असून टेक्सास, अमेरिकेत असतो.
9/ 11
अभिनयाव्यतिरिक्त मृणाल उत्तम डान्सर आणि गायिका देखील आहे. तिचा आवाज तिच्या चाहत्यांना फारच आवडतो.
10/ 11
मागील वर्षी मृणाल 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या सुपरहिट मालिकेत दिसली होती. अभिनेता शशांक केतकर सोबत तिची मालिता लोकप्रिय ठरली होती.
11/ 11
मृणाल सध्या कोणत्याही मालिकेत दिसत नाही. तर ती पती निरजसोबत टेक्सासमध्ये राहत आहे. सोशल मीडियावर ती काही फोटो शेअर करत असते.