बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.यानिमित्ताने अभिनेत्रीवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान अनेकांना अभिनेत्रीबाबत न ऐकलेल्या किंवा माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आज आपण याबाबतच पाहणार आहोत. कियारा अडवाणीचा जन्म 31 जुलै 1992मध्ये मुंबई येथे झाला होता. 2014 मधील 'फगली' या चित्रपटातून कियारा अडवाणीने बॉलिवूड डेब्यू केला होता. कियाराचं खरं नाव आलिया अडवाणी आहे. मात्र अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी आपलं नाव बदललं होतं. अभिनेत्रीला आपलं नाव बदलण्याचा सल्ला बॉलिवूड दबंग सलमान खानने दिला होता. कारण त्यावेळी आलिया भट्टने बॉलिवूड डेब्यू केला होता.. आणि ती बऱ्यापैकी हिटसुद्धा ठरली होती. कियाराने प्रियांका चोप्राच्या 'अंजाना अंजानी' या चित्रपटातून हे नाव निवडलं होतं. कियारा अडवाणीने मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे.