Karan Johar Birthday: दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, टॉक शो होस्ट आणि टीव्ही जज अशी ओळख असलेलं नाव म्हणजे करण जोहर. करण जोहरच्या काम आणि चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बरीच चर्चा झाली आहे. आज 25 मे 2023 रोजी करण जोहर त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या निमित्ताने आज आपण त्याच्या चित्रपटांबद्दल नाही तर त्याच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेऊया.
करण जोहर त्याच्या काम आणि चित्रपटांसोबतच अनेकवेळा ट्रोलिंगचाही शिकार झाला आहे आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बरीच चर्चा झाली आहे. आज, 2५ मे 2023 रोजी करण जोहर त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/ 8
करण जोहरने अनेकवेळा जाहीरपणे मान्य केले आहे की तो कोणावर तरी प्रेम करत असे, ती एक बॉलिवूड अभिनेत्री होती आणि त्याने त्या अभिनेत्रीबाबत आपले प्रेमही व्यक्त केले होते.
3/ 8
करण जोहरने अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकाच मुलीवर प्रेम केलं आहे, जिला तो लहानपणापासून ओळखत होता. करण जोहरची प्रिय व्यक्ती, ती एक अभिनेत्री आहे आणि आज ती एका मोठ्या सुपरस्टारची पत्नी देखील आहे.
4/ 8
करण जोहर जिच्यावर प्रेम करत होता, तिचे नाव ट्विंकल खन्ना आहे.
5/ 8
2015 मध्ये, ट्विंकल खन्नाच्या पहिल्या पुस्तकाच्या लाँचिंगच्या दिवशी, तिने स्टेजवर सांगितले होते की ट्विंकल खन्ना ही एकमेव महिला होती ज्यावर करण जोहर प्रेम करत होता.
6/ 8
याविषयी तो म्हणाला होता की ट्विंकल ही पहिली आणि एकमेव महिला होती जिच्यावर त्याने प्रेम केले होते. नंतर कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये त्याने सांगितले होते की, एक वेळ अशी होती की जेव्हा त्याला वाटले की तो ट्विंकल खन्नाच्या प्रेमात आहे आणि त्याने हे अभिनेत्रीलाही सांगितले होते.
7/ 8
करण जोहर आणि ट्विंकल खन्ना एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होते. एवढेच नाही तर करण जोहर जेव्हा 'कुछ कुछ होता है' बनवत होता, तेव्हा त्याने यापूर्वी राणी मुखर्जीची म्हणजेच 'टीना'ची भूमिका ट्विंकल खन्नाला ऑफर केली होती.
8/ 8
पण ट्विंकलने करण जोहरची ऑफर नाकारल्याने त्याचे मन दुखावले होते. तुम्हाला माहिती असेलच की ट्विंकल खन्ना आता बॉलिवूडच्या 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमारची पत्नी आहे. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले होते.