Happy Birthday John Abraham: मॉडेलिंगपासून केली करियरची सुरुवात, आज बॉलिवूडमध्ये जबरदस्त 'धूम'
Happy Birthday John Abraham: हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हिरो आहेत. पण काही स्वत: ला सिद्ध करून एक वेगळं स्थान निर्माण करतात आणि विशेषत्वाने लक्षात राहतात. असंच एक नाव आहे जॉन अब्राहम. जॉनने मॉडेलिंगमधून कामाला सुरुवात केली होती. त्याने (John Abraham) दिग्दर्शक महेश भट यांच्या (Mahesh Bhatt) 'जिस्म' (Jism) चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.


बॉलीवूडमधला सर्वांत फिट आणि स्मार्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या जॉन अब्राहम आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. 17 दिसंबर 1972 ला केरळात जन्मलेल्या जॉनची परदेशातही मोठी फॅन फॉलोइंग आहे. परदेशातही जबरदस्त फॅन असलेल्या मोजक्याच कलाकारांमध्ये त्याचा समावेश होतो. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


जॉनची आई पारशी आणि वडील मल्याळी आहेत. जॉनचं पारशी नाव फरहान, पण त्याच्या वडिलांनी त्याला जॉन हे नाव दिलं आणि त्याच नावाने त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


जॉन अब्राहमनी मॉडेलिंगमधून कामाला सुरुवात केली. तो एकेकाळी सुपर मॉडेल होता. मॉडेलिंग करण्यापूर्वी त्याने मीडिया प्लॅनर म्हणूनही काम केलं आहे. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


जॉनने (John Abraham) दिग्दर्शक महेश भट यांच्या (Mahesh Bhatt) 'जिस्म' (Jism) चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यावेळची त्याची गर्लफ्रेंड बिपाशा बसूही या चित्रपटात होती. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


मिळालेल्या माहितीनुसार, 'जिस्म' चित्रपटानंतर जॉन एका ज्योतिषाला भेटला होता. त्या ज्योतिषाने जॉनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भविष्यच नसल्याचं सांगितलं. पण जॉननी ते भविष्य खोटं करून दाखवलं. तो आता केवळ अभिनेता नाही, तर यशस्वी निर्माताही झाला आहे. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


जॉन अब्राहमच्या सुरुवातीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. 'जिस्म', 'पाप', 'लकीर', 'साया' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


2004 मध्ये आलेल्या 'धूम' चित्रपटाने जॉनला खरी ओळख आणि यशही मिळवून दिलं. या चित्रपटातल्या त्याच्या खलनायकी भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेतलं. लांब केस, सिक्स पॅक अब्ज आणि सुपर बाईकसोबत जॉन, भारतीय तरुणांसाठी यूथ आयकॉनच झाला होता. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


जॉन अब्राहमला सुपर बाईक्सचं वेड आहे. त्याच्याकडे लाखों रुपयांच्या अनेक सुपर बाईक आहेत. यात बीएमडब्लू, होंडा सीबीआर, अप्रिलिया, यामाहा, एम वी अगस्ता आणि डुकाटी या कंपन्यांच्या बाईकचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)


अभिनयाबरोबरच जॉन निर्माताही झाला आहे. 'विकी डोनर' हा त्याचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता आणि तो मोठ्या पडद्यावर सुपरहिटही झाला. त्यानंतर त्याने 'मद्रास कॅफे' चित्रपटाचीही निर्मिती केली होती, ज्यात त्यानेच प्रमुख भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य : John Abraham Instagram)