B'day Special: मुंबईत राहण्यासाठी नव्हतं घर, गॅरेजमध्ये झोपायचे धर्मेंद्र, ‘ही मॅन’चा यशासाठी संघर्ष
बॉलिवूडमधील ‘ही मॅन’ (HI MAN) अशी ओळख असणारे अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) आज आपला 85वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म पंजाबमधील नसराली येथे 8 डिसेंबर 1935 रोजी झाला.


देखणा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत (Bollywood) आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आजही देशातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. अर्थातच हे यश मिळवण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. (फोटो सौजन्यः Instagram @aapkadharam)


इंडियन आयडॉलच्या (Indian Idol) 11व्या पर्वात त्यांनी एकदा हजेरी लावली होती. त्यावेळी आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना ते म्हणाले की, हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन ते जेव्हा मुंबईत आले, तेव्हा त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं. कुठेही राहण्याची सोय नव्हती, तेव्हा एका गॅरेजमध्ये (Garage) ते झोपत असत. (फोटो सौजन्यः Instagram @aapkadharam)


घर नसल्यानं गॅरेजमध्ये झोपावं लागत असलं, तरी त्यांचा आशावाद होता. भरपूर पैसे कमावण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी होती. (फोटो सौजन्यः Instagram @aapkadharam)


त्या काळात त्यांनी पैसे कमवण्यासाठी एक पार्टटाईम नोकरी केली. त्यांना महिना 200 रुपये पगार मिळत होते. ते म्हणाले, शाळेत शिकत असताना शाळेतून घरी परतण्याच्या मार्गावर एक पूल होता, तिथं बसून ते तासनतास आपल्या स्वप्नांविषयी, आपल्या ध्येयाविषयी विचार करत. (फोटो सौजन्यः Instagram @aapkadharam)