मिस इंडिया ते ‘बॉलिवूड अभिनेत्री’चा पल्ला गाठताना पायलटही झाली; ओळखलंत का हिला?
अभिनेत्री गुल पनाग (Gul Panag) आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाप्रमाणेच विविध क्षेत्रात तिने आपलं नशीब आजमावलं आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी
अभिनेत्री गुल पनागचा जन्म 3 जानेवारी 1979 रोजी चंदीगडमध्ये झाला. गुल पनागच्या अंगात सैनिकांचं रक्त आहे. तिला खेळामध्ये अतिशय रस आहे.
2/ 9
1999 सालचा मिस इंडिया पुरस्कारही तिला मिळाला आहे. अभिनयात करिअर करण्याच्या आधी तिचा कल मॉडलिंगकडे होता. गुल पनागने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भाग घेतला होता.
3/ 9
गुल पनाग एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय उत्तम पायलटही आहे. तिच्याकडे कमर्शिअल पायलटचं लायसन्सही आहे. गुल नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे पायलटच्या वेशातले फोटो शेअर करत असते.
4/ 9
एवढंच काय ती एक उत्तम बाईक रायडरही आहे. बाईक रायडिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला आहे.
5/ 9
1999 मध्ये मिस इंडिया झाल्यानंतर 2003 मध्ये धूप या चित्रपटाने तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर जर्म, दोर, मनोरमा सिक्स फीट अंडर, ग्रीष्मकालीन 2007, हॅलो, अनुभव, अबतक छप्पन 2, अंबरसारिया अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
6/ 9
चित्रपटांव्यतिरिक्त, गुल पनाग वेब सीरिज आणि छोट्या पडद्यावरुनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काश्मीर, सुंदर, द फॅमिली मॅन, रंगबाज फिरसे, पाताल लोक, पवन अँड पूजा या सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिने आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे.
7/ 9
गुल पनागला तिचं खासगी आयुष्य जगजाहीर करायला आवडत नाही. वयाच्या 39 व्या वर्षी ती आई झाली. 2018 मध्ये तिच्या मुलाचा जन्म झाला.
8/ 9
गुल पनागचे पती हेदेखील पायलट असून त्यांचं नाव ऋषी अटारी आहे. 1 मार्च 2011 रोजी चंदीगडच्या गुरुद्वारामध्ये पंजाबी पद्धतीने तिनं लग्न केलं. गुल पनाग यांनीही राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे.
9/ 9
2014 मध्ये तिने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. तसंच चंदीगडमधून सार्वत्रिक निवडणूकही लढवली होती पण तिला अभिनेत्री किरण खेर यांच्याकडून हार पत्करावी लागली होती.