

गोविंदाची डायलॉग डिलिव्हरी आणि डान्स फारच प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर लोक आजही त्याला तितकच फॉलो करतात. गोविंदाची प्रत्येक अभिनेत्रींसोबत छान केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली.


सुरुवातीच्या काळात स्वर्ग सिनेमामुळे तमाम तरुण वर्गाच्या गळ्यातील ताईत बनलेला गोविंदा हळूहळू महिलांमध्ये प्रसिद्ध होऊ लागला होता. त्याकाळी ग्रामीण भागामध्ये सिरिअलचा इतका प्रभाव नसल्यामुळे गोविंदा आणि कादर खानच्या अभिनयाची महिला चर्चा करत होत्या.


गोविंदासोबत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींनी कामं केली आहेत. प्रत्येक अभिनेत्रीसोबत काम करताना गोविंदानं एक वेगळीच छाप पाडली आहे. पण त्याकाळी चर्चा होती ती एका वेगळ्याचं अभिनेत्रीची होती.


करिष्मा कपूर आणि गोविंदाच्या सिनेमांमुळे लोकांमध्ये त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा होऊ लागली. महिलांमध्ये गोविंदा जास्त प्रसिद्ध असल्यामुळे गोविंदाच्या आणि करिष्माच्या प्रेम प्रकरणाच्या गप्पा रंगू लागल्या होत्या. अनेकांना तर असेही वाटू लागले होते की ते दोघं खऱ्या आयुष्यातही नवरा बायको आहेत.