

आज दीपिकाचा वाढदिवस. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस. रणवीर आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत, हे तर त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवतंच.


एका मुलाखतीत दीपिकानं सांगितलं, रणवीर त्याचे आई-वडील, बहीण यापेक्षा मलाच जास्त घाबरतो. त्याच्याकडून काही करून घ्यायचं असेल तर आई-वडील मलाच त्याला सांगायला सांगतात.'


दीपिका म्हणाली, तिची आणि रणवीरची भेट सिंगापूरला एका अवाॅर्ड सोहळ्यात झाली. त्यावेळी रणवीरनं दीपिकासोबत फ्लर्टिंग सुरू केलं. खरं तर रणवीर त्यावेळी अजून कुणाला तरी डेट करत होता, असं दीपिका म्हणते.


त्यानंतर रणवीर सेटवर येऊन दीपिकाला भेटायला लागला. संजय लीला भन्साळीचा रामलीला हा त्यांचा पहिला सिनेमा. तेव्हाच त्यांचं प्रेम बहरलं.


दीपिका प्रेमाचा तो एक क्षण सांगते. ती म्हणाली, ' संजय लीला भन्साळीनं आम्हा दोघांना लंचला बोलावलं होतं. त्यावेळी माझ्या दातात काही अडकलं होतं. रणवीर म्हणाला, तुझ्या दातात खेकडा अडकलाय. मी म्हटलं मग काढून दे. त्याच वेळी तो मला स्पेशल आहे, हे जाणवलं.'


सुरुवातीला रिलेशनशिपमध्ये बरेच टक्केटोणपे खाल्यामुळे दीपिकानं रणवीरला सांगितलं की आपण ओपन रिलेशनशिपमध्ये राहू. मी काही तुला कमिटमेंट देत नाही.