साउथ सिनेमाचे (South Cinema) सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) यांची लोकप्रियता साउथ चित्रपटांपूर्ती मर्यादीत नाही. हिंदी सिनेमातही ते लोकप्रिय आहेत. वाढदिवसानिमित्त पाहा त्यांच्याविषयी खास गोष्टी.
2/ 8
चिरंजीवी यांचा जन्म 22 ऑगस्ट, 1955 लाआंध्र प्रदेशातील मोगालथुरमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव कोनीडेला शिव शंकर वरा प्रसाद आहे. पण त्यांच्या आईमुळे त्यांनी नाव बदलल्याचं सांगण्यात येतं.
3/ 8
1980 मध्ये त्यांनी सुरेखा यांच्याशी विवाह केला होता. त्यांना तीन मुलं आहेत. (Chiranjeevi Son). मुलगा अभिनेता राम चरण (Ram charan) तेजा आहे. मुली श्रीजा आणि सुष्मिता आहेत.
4/ 8
राम चरणने 14 जून, 2012 मध्ये विवाह केला होता. त्याने अपोलो हॉस्पिटलचे एक्झीक्युटीव्ह चेयरमॅन प्रताप सी रेड्डी यांची नात उपासना कामिनेनी हिच्याशी विवाह केला. ती एका अरबपती कुटुंबातील आहे.
5/ 8
चिरंजीवी एक बिझनेसमॅन देखील आहेत. यशस्वी अभिनेता होताना त्यांनी व्यवसायही योग्य पद्धतीने सांभाळले आहेत.
6/ 8
चिरंजीवी यांचे वडील पोलिस हवालदार होते. त्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. त्यामुळे ते आपल्या आजीकडे राहायचे. १९७६ साली त्यांनी मद्रास अभिनय शाळेत प्रवेश घेतला होता.
7/ 8
'पुनधिरल्लु'मधून त्यांनी अभिनयाला सुरूवात केली होती. पण 'प्रणाम खरीदु' (1978) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम करण्ायस सुरूवात केली.
8/ 8
चिरंजीवी यांना तब्बल 10 वेळा फिल्मफेयर साउथ अवॉर्ड (Filmfare South Award) मिळाले आहेत. २००८ साली कते राजकारणातही गेले होते. प्रजा राज्यम पार्टी हा पक्ष त्यांनी स्थपन केला होता. त्यानंतर त्यांची पार्टी काँग्रेसमध्ये विलिन करण्यात आली.