लोकप्रिय संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांची प्रसिद्धी सर्वदूर आहे. बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये डिस्को आणि पॉप संगीत आणलं होतं. बप्पी लहरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 मध्ये झाला. आतापर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीत अतिशय सुंदर गाणी गायली असून आजही लोकांच्या तोंडात ही गाणी बसलेली आहेत. (फोटो सौजन्य-:बप्पी लहरी/इंस्टाग्राम)
कोलकात्यात जन्मलेल्या बप्पी लहिरी यांचे मुळ नाव आलोकेश लहरी असे होते. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळख बनवायची होती. त्यांचे वडिल अपरेश लहिरी हे प्रसिद्ध बंगाली गायक होते. त्यांची आई बासुरी लहिरी देखील संगीतकार होत्या (फोटो- बप्पी लहिरी/इन्स्टाग्राम- फोटोमध्ये बप्पी लहिरींबरोबर लता मंगेशकर आहेत)
बप्पी लहिरी अनोख्या गायनशैलीसाठी ओळखले जातात. एका मुलाखतीत त्यांनी असे सांगितले होते की, एवढे सोन्याचे दागिने घालण्याची प्रेरणा गायक एलविस प्रेस्ले यांच्याकडून मिळाली होती. सुरुवातीला ते केवळ सोन्याची चेन आणि ब्रेसलेट घालत होते. परंतु त्यानंतर अन्य दागिन्यांची आवड निर्माण झाल्याने त्यांनी दागिने घालण्यास सुरुवात केली. त्यांना पहिली चेन त्यांच्या आईने भेट दिली होती तर दुसरी पत्नीने भेट दिली होती. (फोटो सौजन्य- बप्पी लहिरी/इन्स्टाग्राम)