अभिनेता अर्जून कपूर आणि जान्हवी कपूर दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपापली जागा निर्माण केली आहे. पण हे बहीण भाऊ श्रीदेवींच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने कॅमेऱ्यासमोर येऊ लागले. पाहा त्यांच्यातील हे घट्ट नातं कसं आहे.
2/ 8
2018 मध्ये अभिनेत्री श्रीदेवी याचं निधन झालं. पण त्याआधी अर्जुन आणि जान्हवी कधीही एकत्र कॅमेऱ्यावर दिसले नव्हते. पण त्यानंत त्यांच्यात चांगलं बाँडिंग पाहायला मिळालं. अर्जुनने त्यांच्यातील या नात्याचा एका मुलाखतीत खुलासाही केला होता.
3/ 8
श्रीदेवींच्या निधनानंतर वडिल बोनी कपूर आणि जान्हवी कपूर , खूशी कपूर पूर्णपणे दुःखात बुडाले होते. तेव्हा अर्जुनने त्यांच्यातील सगळे मतभेद विसरत आपल्या कुटुंबाला आधार दिला होता.
4/ 8
श्रीदेवी यांचा दुबईत आकस्मित मृत्यु झाला होता. त्यामुळे कपूर कुटुंबावर मोठा दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. तेव्हा अर्जूनने त्याच्या बहिणींना मोठा आधार दिला. व त्यांच्याशी चांगला बॉन्ड ही निर्माण केला होता.
5/ 8
अर्जुन आणि अंशुला हे बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. पण जान्हवी आणि खुशी यांच्याशी त्यांचं बॉन्डिंग जास्त कधीच पाहायला मिळालं नव्हतं.
6/ 8
जान्हवीप्रमाणेच अर्जूनच्याही आईचं त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीचं निधन झालं होतं. तेव्हा अर्जूनने याविषयी बोलताना म्हटलं होतं की, "मी माझ्या आयुष्यातील काही चांगले क्षण त्यांना देऊ शकत असेन तर मी ते नक्की देण्याचा प्रयत्न करेन."
7/ 8
यानंतर अर्जुन आणि जान्हवी करण जोहरच्या शोमध्येही दिसले होते. त्यांनी त्याचं बहीण भावाचं सुंदर नातं दाखवून दिलं होतं.
8/ 8
अनेकदा जान्हवी, खुशी, अंशुला आणि अर्जून आता एकत्र दिसतात. कपूर कुटुंबियांच्या अनेक समारंभात ते दिसतात.