अरजित सिंहची छोटीशी चूक आणि भाईजानशी दुश्मनी, काय आहे दोघांमधील भांडणाचं कारण
भाईजान अरजितवर एवढा नाराज आहे की त्याच्या नाराजीमुळे अरजितला मात्र बरंच नुकसान सोसावं लागलं आहे.
|
1/ 12
बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर अरजित सिंह याचा आज वाढदिवस ज्या गाण्याला अरजितनं हात लावला ते गाणं सुपरहिट झालं असं मानलं जातं. मात्र बॉलिवूडचा दबंग सलमान खानला मात्र त्याला आवाज अजिबात आवडत नाही.
2/ 12
एका अरवॉर्ड फंक्शनमध्ये घडलेल्या घटनेमुळे भाईजान अरजितवर एवढा नाराज आहे की त्याच्या एकाही सिनेमात त्याचं गाणं अद्याप ऐकू आलेलं नाही. इतकंच नाही तर ज्या सिनेमात सलमान कॅमियो रोल करतो त्यातूनही अरजितला बाहेर करण्यात आलं आहे.
3/ 12
अरजितवर सलमान एवढा नाराज आहे की, जणू त्यानं शपथच घेतली आहे की ज्या सिनेमात अरजित गाणं गात असेल त्या सिनेमात तो स्वतः काम करणार नाही. सलमानच्या या नाराजीमुळे अरजितला मात्र बरंच नुकसान सोसावं लागलं आहे.
4/ 12
2014 मध्ये झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात अरजितला 'आशिकी 2' च्या 'तुम ही हो' गाण्यासाठी अवॉर्ड मिळाला होता. ज्याची घोषणा सलमान करत होता.
5/ 12
जेव्हा सलमाननं अरजितचं नाव घेतलं तेव्हा समजलं की तो त्याच्या सीटवर झोपून गेला होता. त्याला कोणीतरी उठवलं आणि तो अस्ताव्यस्त अवतारात स्टेजवर पोहोचला. त्यावेळी त्यानं लोअर शर्ट आणि पायात चप्पल घातली होती.
6/ 12
सलमाननं त्याची खिल्ली उडवत विचारलं, तू झोपला होतास का? त्यावर अरजित म्हणाला, तुम्ही लोकांनी तर मला झोपवूनच टाकलं.
7/ 12
अरजितच्या या कमेंटवर सलमान नाराज झाला. त्यानं फंक्शनमध्ये काही दाखवलं नाही मात्र त्या दिवसानंतर अरजित-सलमानमध्ये दुश्मनी झाली ती आजपर्यंत कायम आहे.
8/ 12
अर्थात अरजितनं झालेल्या प्रसंगाबद्दल अनेकदा सर्वांसमोर माफी मागितली. मात्र भाईजाननं त्याला माफ केलं नाही. अरजितनं फक्त मीडियासमोरच नाही तर सोशल मीडियावरही भलीमोठी माफीनाम्याची पोस्ट शेअर केली होती.
9/ 12
2015 मध्ये आलेल्या सुलतान सिनेमातील जग घुमेया हे गाणं अरजितनं गायलं होतं. मात्र रागावलेल्या सलमाननं या गाण्यातून अरजितला काढून टाकलं.
10/ 12
त्यावेळीही सर्वांसमोर माफी मागत अरजितनं या गाण्यातून काढून न टाकण्याची विनंती केली होती मात्र सलमाननं त्याचं म्हणणं ऐकलं नाही. शेवटी हे गाणं राहत फतेह अली खान यांनी गायलं.
11/ 12
याशिवाय सोनाक्षी सिन्हाचा सिनेमा वेलकम टू न्यूयॉर्क या सिनेमात सलमाननं कॅमियो रोल केला होता. मात्र त्यासाठी त्याची अट होती की, या सिनेमातून अरजितची गाणी काढून टाकण्यात यावी.
12/ 12
फिल्म मेकर्सनी अखेर सलमानची अट मान्य केली आणि यातून अरजितचं रोमँटिक साँग हटवण्यात आलं जे नंतर राहत फतेह अली खान यांनी गायलं. (संकलन- मेघा जेठे.)