Ankush Chaudhari B'day: 10 वर्षे डेटिंग नंतर लग्न; फारच फिल्मी आहे अंकुश-दीपाची Love Story
Happy Birthday Ankush Chaudhari: आज अंकुश चौधरी आपला वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे अंकुश आणि दीपाच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आजच आहे. यानिमित्ताने आपण त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.
मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अंकुश चौधरी. अंकुशनं दुनियादारीमध्ये साकारलेला दिघ्या असो मग क्लासमेटमधील सत्या. त्यानं नेहमी प्रत्येक भूमिका कमालीन वठवली आहे.
2/ 8
आज अंकुश चौधरी आपला वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे अंकुश आणि दीपाच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आजच आहे. यानिमित्ताने आपण त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.
3/ 8
दुनियादारीमध्ये प्रेमाच्या दुनियेत अयशस्वी ठरलेल्या अंकुशची रिअल लाइफ लव्ह मात्र यशस्वी ठरली.
4/ 8
10 वर्षांच्या दिर्घकाळ रिलेशनशिपनंतर अंकुशनं अभिनेत्री दिपा परबशी लग्न केलं.
5/ 8
अंकुश चौधरी आणि दिपा परब एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये लग्न केलं होतं.
6/ 8
आता त्यांच्या लग्नाला जवळापास १४ वर्षे झाली आहेत. पण या दोघांची लव्हस्टोरी मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे.
7/ 8
दिपा परब आणि अंकुश चौधरी यांचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालं. मुंबईच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अंकुश आणि दिपा यांची ओळख अभिनयामुळेच झाली होती.
8/ 8
दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवड त्यामुळे कॉलेजच्या नाटक-एकांकिकांमुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कॉलेजमध्ये असताना या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं होतं.