HBD: RJ असा झाला अभिनेता; पाहा अभिजीत खांडकेकरचा प्रेरणादायी प्रवास
अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या खास गोष्टी.
|
1/ 9
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता अशी अभिजीत खांडकेकरची ओळख आहे. लोकप्रिय मालिकांमधून अभिजीतने प्रेक्षकांचं मनं जिंकल आहे. अभिजीतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या खास गोष्टी.
2/ 9
अभिजीतचा जन्म ७ जुलै १९८६ ला पुण्यात झाला होता. त्याचं बालपणही पुण्यातच गेलं. तसेच शिक्षणही त्याने पुण्यातच पूर्ण केलं होतं.
3/ 9
अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी अभिजीत एक आरजे होता. उत्तम वकृत्व कला आणि संभाषण कौशल्य यामुळे अभिजीत अभिनयाकडे वळला.
4/ 9
अभिजीतने झी मराठीवरील महाराष्ट्राज सुपरस्टार्स या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर अभिजीत टीव्हीवर सक्रिय झाला. तसेच तो अभिनयक्षेत्राकडेही वळला.
5/ 9
२०१० साली अभिजीतला झी मराठीवरील माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका मिळाली. अभिनेत्री मृणाल दुसानिससोबत त्याची जोडी हिट ठरली होती. यानंतर अभिजीतला मोठी लोकप्रियताही मिळाली.
6/ 9
यानंतर अभिजीतने काही चित्रपटांतही काम केलं. जास्त चित्रपटांत तो दिसला नाही. तर पुन्हा एकदा तो टीव्हीकडे वळला.
7/ 9
यानंतर अभिजीत झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तो दिसला होता. अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
8/ 9
२०१३ साली अभिजीतने अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिच्याशी विवाह केला होता. सुखदा देखील एक अभिनेत्री आहे. सध्या ती अहिल्या या हिंदी मालिकेत काम करत आहे.
9/ 9
अभिजीत सध्या' क्रिमिनल्स ..चाहूल गुन्हेगारांची' या क्राइम बेस मालिकेत होस्ट म्हणून काम करत आहे.