मैत्री...प्रेम...लग्न…; पाहा आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटीलची 10 Year Love Story
मराठीतील दोन प्रसिद्ध कलाकारांनी लॉकडाउनमध्येच केलं लग्न; पाहा त्यांची पहिली भेट कधी आणि कुठे झाली होती?
|
1/ 11
मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale). आस्ताद आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी नुकतच लग्न केलं आहे. पाहा कशी होती त्यांची लाँगटाईम रिलेशनशिप लव्हस्टोरी.
2/ 11
आस्ताद आणि स्वप्नाली हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कपल आहे. तर नुकतेच ते लग्न बंधनात अडकले आहेत.
3/ 11
आस्तादने नाटकापासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर तो टेलिव्हिझन कडे वळला, एका मालिकेच्या सेटवर आस्ताद आणि स्वप्नालीची ओळख झाली होती.
4/ 11
ब्लॅक आउटफिट्स मध्ये आस्ताद आणि स्वप्नाली अतिशय आकर्षक दिसत आहेत. आस्ताद अभिनया व्यतिरिक्त एक प्रोफेशनल गायक देखिल आहे.
5/ 11
स्वप्नाली आणि आस्ताद 2011 साली 'पुढचं पाऊल' या मालिकेच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
6/ 11
तब्बल 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये एकमेकांशी विवाह केला.
7/ 11
नोंदणी पद्धतीने विवाह करत त्यानंतर आप्तस्वकियांना रिसेप्शन पार्टी देण्यात आली होती.
8/ 11
आस्ताद आणि स्वप्नालीने लग्नासाठी मरून रंगाचे पोषाख परिधान केले होते, त्याच ते अतिशय आकर्षक दिसत होते.
9/ 11
आस्ताद बिग बॉस मराठी मध्ये स्पर्धक असताना त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. तर त्या मुलीच नाव स्वप्नाली असं सांगितलं होत.
10/ 11
आस्ताद आणि स्वप्नालीने कोणत्याही तामझाम विना लग्न केलं होत. तर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं होतं.
11/ 11
आस्ताद आणि स्वप्नाली आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवताना. आस्तादचा आज वाढदिवस असल्याने त्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.