HBD: बॉलिवूडमधून हळूहळू गायब झाला हा हॅन्डसम अभिनेता; पाहा 'मस्ती' फेम आफताबचा प्रवास
बॉलिवूडमधून आफताब शिवदासनी हा हॅन्डसम अभिनेता हळूहळू गायब झाला. बालकलाकार म्हणूनही त्याने काम केलं होतं.
|
1/ 10
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री कालांतराने नाहिसे होतात किंवा कमी दिसू लागतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता आफताब शिवदासनी (Aftab Shivdasani). पाहा आफताबचा अभिनय प्रवास.
2/ 10
आफताबचा जन्म २५ जून १९७८ला मुंबईत झाला होता. आफताबने बालकलाकार म्हणून आभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
3/ 10
मिस्टर इंडीया या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर शेहेनशाह, चालबाज, अव्वल नंबर, इन्सानियत या चित्रपटांतही तो बालकलाकर म्हणून झळकला होता.
4/ 10
वयाच्या १९ व्या वर्षीच आफताबला मुख्य अभिनेत्याची भूमिका साकरण्याची संधी मिळाली होती. मस्त या चित्रपटात त्याने काम केलं होतं.
5/ 10
यानंतर अनेक चित्रपटांत तो झळकला काही चित्रपट चालले तर काही चालले ही नाहीत. अनेकदा त्याने सहाय्यक भूमिकाही साकारल्या.
6/ 10
२००४ साली त्याने मस्ती या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट सुपरहीट ठरला होता.
7/ 10
आफताब त्याचं एक प्रोडक्शन हाउसही चालवतो. त्यामुळे तो चित्रपटांत जास्त दिसत नसला तरीही पडद्यामागे त्याचं काम सुरूच आहे.
8/ 10
आफताबच्या आयुष्यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने आपल्याच पत्नीशी दोनदा विवाह केला होता. निन दोसांज हिच्याशी त्याने २०१४ साली विवाह केला होता. पण काही कारणंनी ते वेगळे झाले पण त्यांच्या प्रेमाणे त्यांना पुन्हा एकत्र आणलं २०१७ साली त्यांनी पुन्हा धुमधडाक्यात विवाह केला होता.
9/ 10
आफताब सध्या काही वेबसीरिजमध्ये झळकत आहे. मागील वर्षी तो 'पोइझन 2' या सीरिजमध्ये दिसला होता.
10/ 10
लवकरच तो Special OPS 1.5: The Himmat Story या सीरिजमध्ये दिसणार आहे.