गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या पहायला मिळत आहे. तिच्या लग्नाच्या फंक्शनचेही अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले. आता लग्नानंतर अभिनेत्रीने केलेल्या पहिल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. काय म्हणालीये हंसिका या पोस्टमध्ये पाहा..
अखेर हंसिका मोटवानीने 4 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर बिझनेसमॅन सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधली. हंसिकाच्या लग्नाचे अनेक गोड क्षण सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दोघांवरही नव्या जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
2/ 8
अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचा विवाह राजस्थानमधील जयपूरजवळील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये झाला. अभिनेत्रीच्या फॅन पेज अकाउंटवरून रॉयल वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले होते.
3/ 8
हंसिका मोटवानीने लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हंसिकाने हा सुंदर लेहेंगा पारंपारिक दागिने आणि बांगड्यासह घातला होता. लग्नाच्या खास दिवशी सुहेल कथुरियाने शेरवानी घातली होती. तोही खूप हॅंडसम दिसत होता.
4/ 8
आता लग्नानंतर पहिलीच पोस्ट शेअर करत 'कायम तुझ्यासोबत असेन' असं म्हणत तिने लग्नाची तारीख टाकली आहे.
5/ 8
हंसिकाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते तसेच कलाकार मित्र शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
6/ 8
जयपूरमध्ये 2 डिसेंबरपासून हंसिका आणि सुहेलच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले. सर्व समारंभांमध्ये अभिनेत्रीने तिचा लग्नाचा लूक क्लासी ठेवला.
7/ 8
माता की चौकीसाठी साधी लाल साडी असो, किंवा सूफी रात्रीसाठी क्रीम शरारा असो, किंवा लग्नाआधीच्या पार्टीसाठी पांढरा ड्रेस असो किंवा संगीतासाठी लाल गुलाबी रंगाचा लेहेंगा असो, हंसिका मोटवानी प्रत्येक वेळी सदगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
8/ 8
अखेर हंसिका आणि सोहेल लग्नबंधनात अडकले असून त्यांचे चाहतेही त्यांच्यासाठी खूप आनंदी आहेत.