टीव्हीवरील सुंदर जोडपं बनणार 'आईबाबा', गुरमीत-देबिनानं दिली GOOD NEWS!
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेता गुरमीत चौधरी आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांना ओळखलं जातं. या जोडीने नुकताच गुड न्यूज दिली आहे.
|
1/ 9
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेता गुरमीत चौधरी आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांना ओळखलं जातं. या जोडीने नुकताच गुड न्यूज दिली आहे.
2/ 9
गुरमीत आणि देबिनाने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आपण आईबाबा बनणार असल्याचं सांगितलं आहे.
3/ 9
गुरमीतने आपला आणि देबिनाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीचा बेबी बम्प स्पष्ट दिसत आहे.
4/ 9
गुरमीतने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, 'लवकरच ३ होणार आहोत. ज्युनिअर चौधरी येणार आहे. आपला सर्वांचा आशिर्वाद हवा'. असं म्हणत अभिनेत्यानं गुड न्यूज दिली आहे.
5/ 9
गुरमीतने ही गुड न्यूज शेअर करत सोशल मीडियावर चाहते आणि कलाकार मित्रांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
6/ 9
देबिना आणि गुरमीत सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडते.
7/ 9
या दोघांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर त्यांनी गुड न्यूज दिली आहे.
8/ 9
प्रसिद्ध मालिका 'रामायण' च्या सेटवर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
9/ 9
यामध्ये त्यांनी राम आणि सीताची भूमिका साकारली होती.