सध्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याची जोरदार तयारी सुरु आहे. मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. दरम्यान मुली आणि महिलांमध्ये पाडव्याला कोणता लूक करायचा हा महत्वाचा प्रश्न समोर आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो, अभिनेत्री वीणा जगतापने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे. वीणाने खास पाडव्यासाठी हे फोटोशूट केलं आहे. यामध्ये अभिनेत्रीचा मराठमोळा लूक दिसून येत आहे. वीणाने सुंदर अशी काठपदर साडी नेसली आहे. शिवाय त्याला साजेशी हेअरस्टाईल केली आहे. वीणा जगतापचा प्रत्येक लूक तितकाच खास आहे. त्यामुळे यंदाच्या पाडव्याला तुम्ही तिचा कोणताही लूक ट्राय करु शकता. तुमचा हा लूक अगदीच सर्वांना पसंत पडेल.