

बॉलिवूडचा सर्वात भारी डान्सर कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर आजही अनेकांच्या तोंडावर गोविंदाचं नाव येतं. आपल्या भन्नाट डान्सनी आणि अफलातून संवाद फेकीच्या स्टाईलमुळे गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. याच लाडक्या सुपरस्टारने आज वयाची 57 वर्ष पूर्ण केली आहेत. गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 मध्ये मुंबईत झाला.


1986 साली प्रदर्शित झालेल्या इल्जाम या चित्रपटातून त्याच्या फिल्म करिअरला सुरुवात झाली आणि गोविंदाने मागे वळून पाहिलं नाही.


कुली नंबर 1, राजा बाबू, अखियोसें गोली मारे, हिरो नंबर 1, दुल्हे राजा, शोला और शबनम, साजन चलें ससुराल, जोडी नंबर 1, हसीना मान जाएगी अशा अनेक सुपरहिट चित्रपट गोविंदाने गाजवले.


गोविंदाच्या या ग्लॅमरस आयुष्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण या सुपरस्टारलाही आयुष्याचा संघर्ष चुकला नाही.


त्याच्या वडिलांना जेव्हा व्यवसायात तोटा सहन करावा लागला तेव्हा त्यांना बांद्र्याचा बंगला विकावा लागला होता.


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोविंदाने सुरुवातीच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.


नोकरीच्या शोधात असलेला गोविंदा मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू साठी गेला होता. त्यावेळी इंग्लिश न बोलता आल्यामुळे त्याला ती नोकरी मिळाली नव्हती. गोविंदा अतिशय हताश झाला होता.