शाहरुख खानची पत्नी गौरी खान बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही परंतु तरी देखील ती कायम चर्चेत असते. (Gauri Khan/Instagram)
2/ 10
गौरी ही एक प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर आहे. आतापर्यंत तिनं रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, अक्षय कुमार यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांच्या घरांचं इंटिरिअर केलं आहे. (Gauri Khan/Instagram)
3/ 10
इतरांच्या घरांना डिझाईन करणारी गौरी गेले अनेक महिने शाहरुखच्या ऑफिसला नवा लूक देण्याचा विचार करत होती. (Gauri Khan/Instagram)
4/ 10
अखेर लॉकडाउनचं निमित्त साधून तिनं शाहरुखच्या रेड चिलीज या ऑफिसचा कायापलट केला आहे. (Gauri Khan/Instagram)
5/ 10
तिनं या ऑफिसचे नवे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (Gauri Khan/Instagram)
6/ 10
हे फोटो पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया देत गौरीच्या कामाचं कौतुक केलं आहे. (Gauri Khan/Instagram)
7/ 10
शाहरुखचं ऑफिस हे जळपास 3 हजार चौरस फुट मोठं आहे. या ऑफिसचं छत इंफ्राटॉप सीलिंग सिस्टमनं तयार केलं आहे. (Gauri Khan/Instagram)
8/ 10
हे ऑफिस अगदी एखाद्या बंगल्यासारखं मोठं आहे. शाहरुख आपल्या प्रत्येक भूमिकेची तयारी याच ठिकाणी करतो. त्याला शांतपणे काम करता यावं यासाठी त्यानं या ऑफिसची निर्मिती केली आहे. (Gauri Khan/Instagram)
9/ 10
गौरीच्या मते या ऑफिसला रिडिझाईन करणं अत्यंत कठीण काम होतं. परंतु आठ महिन्यांच्या परिश्रमानंतर हे काम पूर्ण झालं. (Gauri Khan/Instagram)
10/ 10
शाहरुखचे चित्रपट पुन्हा एकदा पहिल्यासारखे सुपरहिट व्हावे यासाठी गौरीनं त्याच्या कामाच्या ठिकाणात काही नवे बदल केले आहेत. (Gauri Khan/Instagram)