11 वर्षांनी लहान असलेल्या झैद दरबारशी गौहर खानने केला निकाह; शाही लग्नाचे PHOTO व्हायरल
बिग बॉस सिझनची विजेती गौहर खान (Gauhar Khan) आणि टिकटॉकर झैद दरबार (Zaid Darbar) यांचा निकाह नुकताच पार पडला. या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.


बिग बॉस 7 ची विजेती ठरलेली गौहर खान (Gauhar Khan) आणि टीकटॉकर झैद दरबार (Zaid Darbar) हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांचं हटके वेडिंग कार्डही व्हायरल झालं होतं. गौहरच्या मेहंदीचे फोटो चाहत्यांना अतिशय पसंत पडले होते.


म्यूझिक कंपोझर इस्माइल दरबार (Ismail Darbar) यांचा मुलगा आणि प्रसिद्ध टिकटॉकर झैद दरबारला (Zaid Darbar) डेट करण्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. मुंबईच्या एका पॉश हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.


गौहर खान आणि झैदच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघं अतिशय खूश दिसत आहेत.


झैद गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. गौहर खान आणि अभिनेता कुशाल टंडन दीर्घकाळासाछी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं टिकलं नाही. कुशालदेखील बिग बॉस प्रतिस्पर्धी होता. शोमध्ये देखील त्यांची केमिस्ट्री दिसून यायची पण त्यांनी कालांतराने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.