गौहर खान हे टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. तसेच अभिनेत्रीने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. गौहर खानने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सर्वच स्त्रियांप्रमाणे प्रेग्नन्सीदरम्यान गौहर खानचंदेखील वजन वाढलं होतं. मात्र डिलिव्हरीच्या अवघ्या दहा दिवसांत गौहर खानने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गौहर खानने आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचं बरंच वजन कमी झालेलं दिसून येत आहे. गौहर खानने फोटो शेअर करत आपण अवघ्या १० दिवसांत १० किलो वजन कमी केल्याचं म्हटलं आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी ६ किलो वजन कमी करण्याचं आपलं टार्गेट असल्याचंही तिने म्हटलंय.