Home » photogallery » entertainment » GANGUBAI KATHIAWADI ALIA BHATT WHITE SAREE LOOK TREND AMRUTA KHANVILKAR SAI TAMHANKAR FOLLOWING TREND MARATHI ENTERTAINMENT MHRN
'गंगुबाई काठियावाडी'ने आणला जबरी ट्रेंड, मराठी अभिनेत्रींना सुद्धा पांढऱ्या साडीची भुरळ
(Gangubai Kathiawadi) गंगुबाई काठियावाडी सिनेमाने पांढऱ्या साडीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला असं चित्र दिसत आहे. याच पांढऱ्या साडीचा ट्रेंड सध्या मराठीमध्ये सुद्धा दिसून येत आहे.
|
1/ 12
गंगुबाई काठियावाडीने पांढऱ्या साडीला एवढं महत्त्व प्राप्त करून दिलं की मराठीमध्ये सुद्धा पांढऱ्या साडीचा ट्रेंड येताना दिसत आहे.
2/ 12
संजय भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी सिनेमात आलिया भट पांढऱ्या साडीच्या वेगवेगळ्या रूपात दिसून आली.
3/ 12
तिने या साड्यांच्या रंगांना सुद्धा खूप सुंदर पद्धतीने विशेषणं दिलेली सिनेमात पाहायला मिळाली.
4/ 12
आलिया प्रमोशनमध्ये सुद्धा हाच लुक कॅरी करताना दिसली. पांढऱ्या साडीमुळे गंगूच्या भूमिकेला एक शांततेची झालर मिळाली. गंगूची शांत प्रतिमा, माया, प्रेम तसंच आलियाचा रोलमधला करारीपणा याचा सुंदर मेळ या लुकने घालून दिला.
5/ 12
गंगुबाई नंतर एप्रिल महिन्यात आलेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अमृता खानविलकर अनेकदा पांढऱ्या साडीमध्ये दिसून आली.
6/ 12
चंद्रमुखीचा बाज हा मराठमोळा असल्याने त्यात साडीला खूप महत्त्व होतं. ते महत्त्व राखून ठेवत अमृताने पांढरी साडी, वेगेवेगळे रंगीत ब्लाउज, नथ, कपाळावर टिकली असे अनेक अप्रतिम लुक तयार केले.
7/ 12
आलिया सिनेमात पांढऱ्या रंगांना जी नावं देते तशीच नावं देऊन अमृताने ‘चांद वाला सफेद’ अशी कॅप्शन फोटोला दिली होती.
8/ 12
आता अमृता पाठोपाठ परामसुंदरी सई ताम्हणकर सुद्धा पांढऱ्या साडीमध्ये दिसून आली आहे.
9/ 12
सईने हा लुक कोणत्याही प्रमोशनसाठी परिधान केला नसला तरी तिच्या कॅप्शनमध्ये ती असं म्हणते “meanwhile me thinking about MHJ”
10/ 12
त्यामुळे हास्यजत्रेच्या नव्या सिजनमध्ये सई पांढऱ्या साडीत दिसून येईल असं या कॅप्शनवरून तरी वाटत आहे.
11/ 12
गंगुबाई सिनेमाने स्त्री भूमिकांचं गणित बदलून टाकलं. त्या पांढऱ्या रंगाच्या साडीला खूप लोकप्रियता मिळाली.
12/ 12
आता मराठीतील काही आघाडीच्या स्त्री अभिनेत्री सुद्धा हा ट्रेंड फॉलो करताना आणि त्यात अक्षरशः बहार आणताना दिसत आहेत.