ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही आहे ‘वंडर वुमन’; केलय इस्त्रायलच्या सैन्यात काम
इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनच्या वादात वंडर वुमननं घेतली उडी; इस्त्रायलची माजी सैनिक असतानाही घेतली नाही स्वत:च्या देशाची बाजू
|
1/ 10
इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. (Israeli–Palestinian conflict) इस्लामी गट आणि पॅलेस्टाईनमधील अतिरेक्यांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळं सामान्य जनता होरपळून निघाली आहे. (Gal Gadot/Instagram)
2/ 10
नुकतंच इस्रायलनं केलेल्या रॉकेट हल्ल्यात पॅलेस्टाइनमधील 35 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेचा प्रभाव सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. (Gal Gadot/Instagram)
3/ 10
जगभरातील सेलिब्रिटी मंडळी दोन्ही पैकी एका देशाच्या बाजूनं आपलं मत ठोकत आहेत. या शाब्दिक युद्धात आता प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गल गेदॉत हिनं देखील उडी मारली आहे. (Gal Gadot/Instagram)
4/ 10
वंडर वुमन ही सुपरहिरो व्यक्तिरेखा साकारुन नावारुपास आलेली गल ही मुळची इस्त्रायली आहे. शिवाय करिअरच्या सुरुवातीस इस्त्रायच्या सैन्यात देखील काम केलं आहे. (Gal Gadot/Instagram)
5/ 10
सैन्यात असताना ती जखमी सैनिकांच्या रुग्णालयात काम करत होती. त्यांना वेळेवर औषधं देणं, उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जाणं, नातेवाईकांना भेटण्यासाठी बोलावणं वगैरे यांसारखी काम ती करत होती. (Gal Gadot/Instagram)
6/ 10
त्यामुळं युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना होणारा त्रास तिनं जवळून पाहिला आहे. शिवाय तिचे वडील देखील सैन्यात काम करत होते. (Gal Gadot/Instagram)
7/ 10
या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धावर गल काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. (Gal Gadot/Instagram)
8/ 10
मात्र तिनं इस्त्रायलची बाजू न घेता हे युद्ध दोन्ही देशांनी थांबवावं अन् चर्चा करुन मार्ग काढावा अशी विनंती केली आहे. कारण युद्धात दोन्ही देशांतील कुटुंब उद्धस्त होतात. आणि स्मशानावर घरं बांधून कोणी आनंदी राहु शकणार नाही असं ती म्हणाली. (Gal Gadot/Instagram)
9/ 10
तिच्या या पोस्टवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. परंतु इस्त्रायलमधील काही नेटकऱ्यांनी मात्र तिच्यावर टीकाचा वर्षाव केला आहे. (Gal Gadot/Instagram)
10/ 10
गल गेदॉतनं आतापर्यंत ट्रिपल नाईन, क्रिमिनल, फास्ट अँड फ्युरिअस, नाईट अँड डे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वंडर वुमन या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. (Gal Gadot/Instagram)