दिग्दर्शकानं निर्मात्यांसोबत भांडण करुन अभिनेत्रीला मिळवून दिली ही भूमिका
|
1/ 10
गल गेदॉत ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Gal Gadot/Instagram)
2/ 10
आज गल गेदॉतचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Gal Gadot/Instagram)
3/ 10
मादक अदा आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर तिनं अल्पाधित तुफान लोकप्रियता मिळवली. (Gal Gadot/Instagram)
4/ 10
तिनं आजवर ट्रिपल नाईन, क्रिमिनल, फास्ट अँड फ्युरिअस, नाईट अँड डे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु तिला खरी लोकप्रियता मिळाली ती वंडर वुमन या व्यक्तिरेखेमुळं. (Gal Gadot/Instagram)
5/ 10
वंडर वुमन ही एक लोकप्रिय सुपरहिरो व्यक्तिरेखा आहे. बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन या चित्रपटात तिनं सर्वप्रथम ही भूमिका साकारली होती. (Gal Gadot/Instagram)
6/ 10
परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ती या चित्रपटात निर्मात्यांची पहिली पसंत नव्हती. तिचे स्तन लहान असल्यामुळं निर्मात्यांनी तिला करारबद्ध केल्यानंतरही बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. (Gal Gadot/Instagram)
7/ 10
परंतु चित्रपटाचा दिग्दर्शक जॅक स्नायडर आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यानं निर्मात्यांनी चक्क भांडण करुन तिला हे काम मिळवून दिला. (Gal Gadot/Instagram)
8/ 10
अभिनेत्रीनं हा अनुभव जिमी किमेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. (Gal Gadot/Instagram)
9/ 10
अखेर दिग्दर्शकाचा निर्णय योग्य ठरला गलने अक्षरश: जिव ओतून ही भूमिका साकारली. त्यानंतर तिनं वंडर वुमन, वंडर वुमन 1984, जस्टिस लीग या चित्रपटांमध्ये ही भूमिका साकारली. (Gal Gadot/Instagram)
10/ 10
या व्यक्तिरेखेनं गलला इतकी लोकप्रियता मिळवून दिली की आज तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी वंडर वुमन या नावानंच ओळखलं जातं. (Gal Gadot/Instagram)