Year Ender 2021: सिद्धार्थ शुक्ला ते दिलीप कुमार या प्रसिद्ध कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
बॉलिवूडसाठी हे वर्ष अत्यंत खराब राहिलं. कारण या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचं निधन झालेलं आहे. यात अनेक कलाकारांच्या मृत्यूचं कारण हे कोरोना संक्रमण किंवा ह्रदयविकाराचा झटका हे होतं. त्यात सिद्धार्थ शुक्ला आणि राजीव कपूर यांचाही समावेश आहे.
बॉलीवुड इंडस्ट्रीनं 2021 या वर्षात अनेक प्रसिद्ध कलाकारांना गमावलेलं आहे. त्यात प्रसिद्ध जेष्ट अभिनेते दिलीप कुमार यांच्यासह अनुभवी संगीतकार श्रवण राठोड यांचाही समावेश होता.
2/ 11
रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ राजीव कपूर यांचं 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली होती.
3/ 11
मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी 20 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळं त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.
4/ 11
नदीम-श्रवण जोडीतील प्रसिद्ध संगीतकार श्रावण राठोड यांचं 23 एप्रिल रोजी निधन झालं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. श्रावण महाकुंभमेळ्यातून परतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.
5/ 11
प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचं 23 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार ते जेवण करत असताना त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. दवाखान्यात नेल्यानंतर काही वेळानं त्यांचं निधन झालं.
6/ 11
लोकप्रिय टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. 1 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
7/ 11
आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल' मधील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभाचा आसाममधील एका रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. ती 35 वर्षांची होती. 2 जून रोजी तेजपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचं निधन झालं.
8/ 11
मंदिरा बेदी यांचे पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचे 30 जून रोजी पहाटे 4.30 वाजता निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
9/ 11
'ट्रॅजेडी किंग' म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते.
10/ 11
ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे 16 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. सुरेखा यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
11/ 11
'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटका त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. रुग्णालयात नेत असताना सिद्धार्थ यांनी अखेरचा श्वास घेतला. शहनाज गिलसोबत त्याची चांगली बॉन्डिंग होती.