अक्षयकुमार आपल्या आगामी सिनेमा लक्ष्मीमुळे खूप चर्चेत आहे. सुरुवातीला हा सिनेमा लक्ष्मी बॉम्ब या नावाने प्रदर्शित करण्यात येणार होता. पण या नावाला विरोध झाल्यानंतर त्याचं नाव आता लक्ष्मी ठेवण्यात आलं आहे. सिनेमाच्या टायटलमुळे हिंदूंच्या भावना दुखवणारं असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे त्याचं नाव बदललं आहे. सिनेमाच्या नावांना विरोध होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील विरोध झालेल्या चित्रपटांची आज आपण माहिती घेणार आहोत.