

ती मोठ्या पडद्यावर आली की रसिकांच्या मनाचा ठावच घेते. आपल्या अभिनयानं सोनाली कुलकर्णीनं फॅन्सच्या मनावर अनेक वर्ष राज्य केलं. आजही तितकीच प्रसन्न आणि उत्साही.


सोनालीचा फिटनेस फंडा काय आहे याची उत्सुकता होतीच. 'काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात ब्रेकथ्रू आला. आपण खातो त्या प्रमाणात व्यायाम करतो का? नक्की काय खातो? या सगळ्याचा मी विचार करायला लागले ती आहारतज्ज्ञ डाॅ. सरिता डावरे यांच्यामुळे.' सोनाली सांगत होती. अन्नाच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी नेहमीच महत्त्वाची असली पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे.


डाएट हे फॅड नसून लाईफ स्टाइल असल्याचं तिला एकदम पटलंय. फिटनेस हा एखाद्या स्पर्धेपुरता किंवा भूमिकेपुरता ठेवायचा नसतो, तो कायमच ठेवावा लागतो, असं ती म्हणाली.


डाएट हे फॅड नसून लाईफ स्टाइल असल्याचं तिला एकदम पटलंय. फिटनेस हा एखाद्या स्पर्धेपुरता किंवा भूमिकेपुरता ठेवायचा नसतो, तो कायमच ठेवावा लागतो, असं ती म्हणाली.


सोनाली सांगते, ' माझी मुलगी कावेरी शाळेत गेली की नंतरचा दीड तास माझा असतो. आणि तिला सुट्टी असली तरी मी ठरलेल्या वेळीच उठते. मग सायकलिंग, स्वीमिंग करते. जास्त वेळ व्यायामाला देते. सोनाली सहा दिवस वर्कआऊट करते. तिला चालायला खूप आवडतं. ती रोज सहा किलोमीटर चालते.


व्यायामाबद्दलही सोनालीची वेगळी फिलाॅसाॅफी आहे. ती म्हणते, ' मी आनंदानं व्यायाम करते. पण फिटनेससाठी मी कसलाही त्याग करत नाही. मी माझ्या कुटुंबालाही तेवढाच वेळ देते. '


सोनाली फिटनेस फंडामध्ये आपल्या विश्रांतीलाही महत्त्व देते. ' एकदा माझा उजवा हात दुखावला होता. बरेच दिवस मनगट दुखत होतं. तेव्हा मला विश्रांतीचं महत्त्व पटलं. आपण जितक्या प्रमाणात व्यायाम करतो तितक्या प्रमाणात विश्रांती घेत नाही.' सोनालीला पूर्वी विश्रांती घेतली की अपराधी वाटायचं. पण आता तिचा दृष्टिकोनच बदललाय. ती सांगते, ' जे मस्त विश्रांती घेतात त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. कमी विश्रांती मिळाली की मानसिक संतुलन बिघडतं.'


सोनाली रात्रीचं जेवण 8च्या आत घेते. अगदी उशिरा पार्टीला जायचं असेल तर ती घरून जेवून जाते. 'जवळच्या मित्रमैत्रिणींना हे माहीत आहे. मग त्यांच्याकडे गेल्यावर ते पहिलं मला जेवायलाच वाढतात.' जेवणात सोनाली तिखट खातच नाही. रात्री झोपताना ती दूध पिऊन झोपते.


सोनाली 12 महिने गरम पाणीच पिते. ती हे मिलिंद सोमणकडून शिकलीय. महत्त्वाचं म्हणजे ती तहान लागल्यावरच पाणी पिते. उगाच पाणी पित बसत नाही.