

सध्या अभिनेत्री मधुरा वेलणकरचं 'गुमनाम है कोई' नाटक सुरू आहे. नाटक, सिनेमांमध्ये आपला ठसा उमटवणारी मधुरानं तिचा फिटनेस फंडा आमच्याशी शेअर केला. ती काय म्हणते ते तिच्याच शब्दात


मला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला आवडत नाही. मी पूर्वी व्यायामशाळेत जायचे. मल्लखांब करायचे. त्यामुळे मला मोकळ्या हवेतला व्यायाम आवडतो.


मी बँडमिंटन खेळते. मला चालायला आवडतं. मी रोज मेडिटेशन आणि प्राणायाम करते. माझ्या फिटनेसमध्ये तेच 90 टक्के आहे.


मृदुला पटवर्धन माझ्या डाएटिशन आहेत. बाळंतपणात वाढलेलं वजन मी 10 किलोनं कमी केलं. तुमचं वजन कधीही 2 किलो वाढलं तर ते लगेच कमी करावं लागतं.


मी गहू खात नाही. जेवणात ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ यांची भाकरी खाते. माझा स्वयंपाक साजुक तुपातला असतो. तेल खात नाही.


ब्रेकफास्टला मी ड्रायफ्रुट्स आणि पंचामृत घेते. मध, तूप, दही ,दूध एकत्र करून पंचामृत बनवलं जातं. याशिवाय अंड, दूध आणि एखादं फळंही घेते.