

काही जण कितीही वर्षाचे झाले तरी त्यांच्या लूकमध्ये फारसा बदल होत नाही. अभिनेता सुनील बर्वे त्यापैकी एक. अगदी आत्ताआत्तापर्यंत मालिकांमध्ये तो नायकच असायचा. चाळीशीनंतरही सुनील बर्वे इतका एव्हरग्रीन कसा दिसतो, हे वाचा त्याच्याच शब्दात


नियमित व्यायाम आणि आहार या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण एक्झरसाईज आणि एक्झर्शन यातला फरकही लक्षात घ्यायला हवा.


व्यायामाच्या वेळी व्यायामच करावा लागतो. म्हणजे नेहमीच्या जीवनात मी ट्रेन पकडतो, एवढं चालतो, जिने उतरतो असं अनेक जण सांगतात. त्यांना तो व्यायाम वाटतो. पण असं करून व्यायाम होत नाही.


मी आरे काॅलनीत नियमित वाॅकला जातो. आठवड्याला 12 ते 13 मीटर धावतो. रोज 5 ते 6 किलेमीटर धावणं होतं.


मला चवीपुरतं खायला आवडतं. मी खाण्याचा फार शौकिन नाही. मी आहार सांभाळतो, त्याच्या आहारी जात नाही.


माझी रोज पूजा असते. तेव्हा दहा मिनिटं मेडिटेशन करतो. एरवी काम करताना त्यात झोकून देतो, तेच माझं मेडिटेशन.


सुनील बर्वे साधंसोपं फिटनेस करतो. पण तो नियमित करतो. त्याच्या चिरतरुण दिसण्यामागे या फिटनेस फंड्याचंही योगदान आहे.