

जय मल्हार मालिकेचा खंडोबा कुणीच विसरू शकणार नाही. अभिनेता देवदत्त नागे त्याच्या पिळदार शरीरासाठी प्रसिद्ध आहे. वाचा त्याचा फिटनेस फंडा त्याच्याच शब्दात


लहानपणापासून मला सुपरमॅन,बॅटमॅन आवडायचे. लहानपणी मी तसा वेषही करायचो. पुढे मोठा होत गेलो, तशी मॅच्युरिटी येत गेली. मी ८वी,९वीपासून व्यायाम करायला सुरुवात केली. रितसर जिममध्ये जायला लागलो.


पण खरं सांगायचं तर मी पेणची हनुमान व्यायामशाळा आणि अलिबागच्या व्यायामशाळेत घडलो. आजही वेळ मिळेल तेव्हा मी तिथे जातो.


माझ्यासाठी जिम म्हणजे मंदिर आहे. तिथे मी घामाचा अभिषेक करतो. मेटल प्लेटचा आवाज म्हणजे मला घंटानाद वाटतो.


जिममध्ये जातो तेव्हा माझी पूर्ण एकाग्रता असते. मी कधीच आजूबाजूला बघत नाही. फक्त आरशात माझ्या मसल्स बघत असतो.


मी बऱ्याच वेळा सुपरसेटिंग करतो. म्हणजे चेस मसल आणि बॅक मसलचा व्यायाम. माझं शरीर बोलत असतं. मी वर्कआऊट संध्याकाळी करणं पसंत करतो.


मी सायकलिंग करतो. मुंबईला असताना रस्त्यावर. पण अलिबागला समुद्र किनारी करतो. त्यावेळी माझा मुलगा निहारही सोबत असतो.


मी तसा डाएट पाळत नाही. मला घरचं जेवण आवडतं. खास करून चिकन आणि राईस.अनेकदा शूट संपल्यावर मी बडे मियाँला जातो.


मी चहाप्रेमी आहे. पूर्वी दिवसाला २०-२५ कप व्हायचे. आता ८ ते १० कप केलेत. हल्ली मुद्दाम चहात साखर कमी घेतो.


वर्कआऊट करतानाच माझे मेडिटेशन होतं. मी माझ्यावर, माझ्या शरीरावर खूप प्रेम करतो. मी स्टिराॅइड घेत नाही.