अभिनेत्री अॅमी जॅक्सन सध्या बॉलिवू़ड पासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते. अॅमी तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत व मुलासोबत वेळ घालवत आहे. २०१५ मध्ये अॅमी मुंबईतून लंडन गेली होती. ब्रिटीश बिझनेसमॅन जॉर्ज पेनेतियोला ती २०१५ पासून डेट करत आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये अॅमीने तिच्या मुलाला जन्म दिला होता. अॅमी आणि जॉर्जने लग्न केलं नाही, मात्र ते एकमेकांना डेट करत आहेत. आई झाल्यानंतरही अॅमीचा फिटनेस कायम आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. अॅमीने हिंदी, इंग्रजी तसेच साउथ चित्रपटांतही काम केलं आहे.