आज 'फादर्स डे' च्या निमित्ताने अनेक सेलिब्रेटी आपल्या वडीलांसोबतचे जुने फोटो शेअर करत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनासुद्धा आपल्या लाडक्या कलाकारांना ओळखणं कठीण झालं आहे. नुकतंच एका अभिनेत्याने आपला बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आईबाबांच्या कुशीत दिसणारा चिमुकला इतर कुणी नसून गायक-होस्ट-अभिनेता आदित्य नारायण आहे. आदित्य नारायणने वडील - लोकप्रिय गायक उदित नारायण आणि आईसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. आदित्य सध्या सोनी वाहिनीवरील 'सुपरस्टार सिंगर 2'हा शो होस्ट करत आहे.