

अभिनेता फरदीन खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. पण आपल्या बदललेल्या लुकमुळे सध्या तो सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच फरदीनला त्याच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. पण बॉडी शेमिंग आणि लुकवर कमेट करणाऱ्यांना फरदीननं सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.


बॉडी शेमिंग आमि लठ्ठपणावर बोलताना फरदीन म्हणाला, मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. नुकतीच फरदीननं पत्नी नताशा आणि बहिण सुझान खानसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेली त्याला बॉडी शेमिंगबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.


फरदीन सांगतो, 'लोकांनी या सर्व गोष्टी सोडून पुढे जायला हवं. कारण, मला यातील कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. मी स्वतःला जसा आहे तसा आरशात पाहू शकतो.'


फरदीन पुढे म्हणाला, मी माझ्या बद्दल लिहिल्या जाणाऱ्या कोणत्याच गोष्टी जास्त वाचत नाही आणि जर कधी वाचलंच तर मला खूप हसू येतं.