'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) फेम 'परी' (Pari New Photo) म्हणजेच सर्वांची लाडकी 'मायरा' ( Mayra Vaikul New Photo) सध्या तिच्या क्यूट क्यूट लुकमुळे सर्वांची लाडकी झाली आहे. परीच्या अभिनयाचं आणि फोटोंच सगळे नेहमीच कौतुक करत असतात. पण परीचा नेहाच्या लग्नातला क्यूट अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनी स्वीट कमेंट्सचा वर्षाव केलाय. पाहा काय म्हणतायत परीचे फॅन्स (Pari Fans Comments)
|
1/ 8
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सध्या नेहा आणि यशच्या लग्नाची तयारी सुरू असली तरी सोशल मीडियावर मात्र परीचीच चर्चा आहे.
2/ 8
नेहा आणि यश लग्नात परी सॉलिड मस्ती करताना दिसणार आहे. परीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/ 8
परी म्हणजेच मायरा वायकूळ नेहमीच तिच्या क्यूट स्टाइलनं सगळ्यांची मनं जिंकत असते. नेहा आणि यशच्या लग्नातील परीच्या लुकनं सर्वांची मन पुन्हा एकदा जिंकली आहेत.
4/ 8
परीचे सध्याचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमावर वर्षाव केलाय. परीच्या या फोटोवर अनेकांनी 'पाहा आमची छोटी रखुमाई, नेहा आणि यशची रुसूबाई', असं म्हटलं आहे.
5/ 8
'परीचा लुक भारी, परीची अँक्टिंग भारी आमची परी सगळ्यांपेक्षा लय भारी' परीचा हा फोटो सर्वांना फार आवडला आहे.
6/ 8
परीनं लाल फ्रॉक आणि डायमंड ज्वेलरीमध्ये केलेलं हे फोटोशूट सर्वांनाच आवडलं आहे. 'क्यूटनेस ओव्हर लोडेड', 'किती गं ते गोड पिल्लू', अशा कमेंट या फोटोवर पाहायला मिळतायत.
7/ 8
परीच्या सगळ्या फोटोंमधल्या तिच्या ज्वेलरीनं देखील सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. अनेकांनी तिला 'नेकलेस कुठून घेतलास ग?' असा क्यूट प्रश्न देखील विचारला आहे.
8/ 8
परीच्या क्यूट फोटोंवर चाहत्यांच्या स्वीट कमेंट्सनी परीवर प्रेमाचा आणि आशिर्वादाचा वर्षाव केला आहे. येत्या भागात परीची आईच्या आणि फ्रेंडच्या लग्नातील मस्ती पाहायला विसरू नका.