Rapper Raftaar Divorce:मनोरंजनसृष्टीत घटस्फोटाचं सत्र सुरुच, रॅपर रफ्तार पत्नीपासून होणार विभक्त
Rapper Raftaar Divorce: बॉलिवूड असो की टीव्ही इंडस्ट्री अनेक सेलिब्रेटी जोडप्यांच्या नात्यांची समीकरणे बिघडलेली समोर येत आहेत.
|
1/ 8
बॉलिवूड असो की टीव्ही इंडस्ट्री अनेक सेलिब्रेटी जोडप्यांच्या नात्यांची समीकरणे बिघडलेली समोर येत आहेत.
2/ 8
सोहेल खान-सीमा खान, राजीव सेन-चारू असोपानंतर आता प्रसिद्ध रॅपर रफ्तार सिंह आणि पत्नी कोमल वोहराच्या नात्यात फूट पडल्याचं दिसत आहे.
3/ 8
रॅपर रफ्तारने 2016 मध्ये कोमल वोहरासोबत लग्न केलं होतं. लग्नामुळे हे दोघे चर्चेत आले होते.
4/ 8
लग्नाच्या तब्बल 6 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.
5/ 8
2020 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोरोनामुळे दोघांचा घटस्फोट होऊ शकला नाही.
6/ 8
गेल्या अनेक दिवसांपासून रफ्तार आणि कोमल विभक्त राहात आहेत.
7/ 8
कोमल वोहरा ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता करण वोहराची बहीण आहे.
8/ 8
हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हे दोघेही आता आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. दरम्यान आता 6 ऑक्टोबर 2022 रोजी हे दोघे आपल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणार आहेत.