युट्यूबर Carry Minati चं बॉलिवूडमध्ये पदार्पण, पहिल्याच सिनेमात बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार
कॅरी मिनाटी (Carry Minati) नावाने फेमस असलेला युटूबर अजय नागर (Ajay Nagar) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या डेब्यू फिल्ममध्येच (Debut Film) त्याला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.


कॅरी मिनाटी (Carry Minati) अजय देवगणच्या (Ajay Devgan) 'मेडे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


हिंदुस्तान टाईम्सशी (Himdustan Times) बोलताना कॅरी मिनाटी म्हणाला, अभिनेता अजय देवगणच्या प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित कुमार मांगत पाठक यांच्याकडून माझा बिजनेस हेड दीपकला फोन आला. याचा अर्थ मी लवकरच त्यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो सौजन्य - @carryminati/Instagram)


अजय नगर म्हणाला, माझे मुख्य उद्दीष्ट लोकांचे मनोरंजन करणे आहे. बॉलीवूडच्या दिशेने जाण्याचा माझा सध्या तरी विचार नाही. पण हे खरं आहे की मला आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. (फोटो सौजन्य - @carryminati/Instagram)


कॅरी म्हणाला, मी या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झालो कारण या सिनेमात मला माझीच भूमिका साकारायची आहे. म्हणून ही भूमिका करणं माझ्यासाठी फार काही वेगळं नाही. (फोटो सौजन्य - @carryminati/Instagram)


'मेडे' या चित्रपटात कॅरी एका छोट्या आणि विशेष भूमिकेत दिसणार आहे. कैरी मिनाटी हा प्रसिद्ध भारतीय युटूबर पैकी एक असून त्याचे युट्युबवर जवळपास 28 मिलिअन्स स्बस्क्राइबर्स आहेत. तसेच येणाऱ्या काळात सिनेमात काम केल्याने कॅरीचे प्रेक्षक आणि चाहते वाढतील यात काही शंका नाही. (फोटो सौजन्य -@carryminati/Instagram)