Family Man Season 2: एका Kiss साठी काय काय केलं? अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागील कहाणी केली शेअर
The Family Man 2: या सीरिजमध्ये झळकलेल्या सर्वच कलाकारांचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. खास करुन सीरिजमधील श्रीकांत तिवारीची मुलगी ध्रीती तिवारी हिची सर्वत्र चर्चा आहे.
द फॅमिली मॅन पार्ट 2 मुळे अश्लेषा ठाकूर या तरुण वयातील अभिनेत्रीची मोठी चर्चा सुरू आहे. लहान वयात कराव्या लागलेल्या किंसिग सीनमुळे तिला अनेक प्रकारच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे.
2/ 12
चाहत्यांनीही तिच्या या सीनबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहे. अशात अश्लेषाने याबाबत आपला अनुभव शेअर केला आहे.
3/ 12
ती आपल्या त्या किसिंग सीनबाबत म्हणते की, ही माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट होती. या सीनसाठी मला आपल्या अभिनयात परिपक्वता आणावी लागली. मला हा सीन सहज आणि उत्स्फूर्त वाटावा अशी इच्छा होती.
4/ 12
या एका सीनसाठी मी खूप रिसर्च केली. मी अनेक वेब-सीरिज पाहिल्या. एका वृत्तपत्राशी बोलताना अश्लेषाने आपला हा अनुभव शेअर केला आहे.
5/ 12
पुढे ती असंही म्हणाली की, किसिंग सीनचं चित्रिकरण करणं हे खूप तांत्रिक असतं. यात काही मजा वगैरे नसते. हे माझं काम आहे आणि एक अभिनेत्री म्हणून माझ्या भूमिकेसाठी ज्याची गरज असेल त्यात मी सहज असणं आवश्यक आहे.
6/ 12
मनोज वाजपेयीची द फॅमेली मॅन ही वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे.
7/ 12
या सीरिजमध्ये झळकलेल्या सर्वच कलाकारांचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. खास करुन सीरिजमधील श्रीकांत तिवारीची मुलगी ध्रीती तिवारी हिची सर्वत्र चर्चा आहे.
8/ 12
ध्रीती तिवारी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्लेषा ठाकुर हिनं साकारली आहे. फॅमेली मॅननंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.
9/ 12
नेटकऱ्यांनी तर तिला नॅशनल क्रश म्हणूनही घोषीत केलं आहे. परंतु ही अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे
10/ 12
अश्लेषानं 2017 मध्ये आलेल्या 'शक्ती अस्तित्व के अहसास की' या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
11/ 12
शिवाय आतापर्यंत तिनं हिमालया, किसान, कॉम्फर्ट, कॅडबरी आणि बजाज या कंपनीच्या जाहिरांतीमध्ये काम केलं आहे.
12/ 12
परंतु अश्लेषाला खरी लोकप्रियता मिळाली फॅमेली मॅन या सीरिजमुळं. या सीरिजमुळं ती रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.