बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा (Evlyn Sharma) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली. डॉक्टर तुषार भिंडी याच्यासोबत तिने विवाह केला आहे. तुषान हा ऑस्ट्रेलियातील एक सर्जन आणि उद्योजक देखील आहे. १५ मे रोजीचं त्यांनी विवाह केला होता. पण आता त्यांनी त्यांच लग्न जाहीर केलं आहे. एव्हलिन आणि तुषान यांनी २०१९ मध्ये आपली एन्गेजमेंट जाहीर केली होती. त्यांनी भारतीय विधीवत धुमधडाक्यात विवाह करण्याची योजना आखली होती. पण सध्याची कोरोना परिस्थिती पाहता त्यांनी साध्या पद्धतीने विवाह केला. एव्हलिन ही भारतीय-जर्मन वंशाची आहे. तर तुषान हा भारतीय असून ऑस्ट्रेलियात स्थाईक आहे. एव्हलिनने 'टर्न लेफ्ट' या हॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. from sydney with love या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती यारियां, इसाक, साहू, हिंदी मिडियम यासांरख्या अनेक चित्रपटांत दिसली होती. एव्हलिन वर तिने दिलेल्या विवाहाच्या बातमीनंतर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.