बोल्डनेससाठी ओळखली जाणारी ईशा गुप्ता बॉलिवूडमधील रोखठोक बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 7 वर्षांपूर्वी 'जन्नत 2' मधून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसचीच चर्चा जास्त झाली.
2/ 7
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ईशानं आपण भारतीय व्हॉलीबॉल टीमची खेळाडू असल्याचा खुलासा केला.
3/ 7
ईशा म्हणते, मी एक नॉर्थ इंडियन मुलगी आहे. मी कधीच विचार केला नव्हता कि, मी कधी अभिनेत्री बनू शकेन, मी कशी दिसते यावर मी नियंत्रण करु शकत नाही. जर निर्मात्यांना मी एखाद्या भूमिकेसाठी योग्य वाटत नसेन तर तो त्यांचा दृष्टीकोन आहे.
4/ 7
इंस्टाग्राम वर सातत्यानं हॉट फोटो शेअर केल्याने ईशा अनेकदा चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या टॉपलेस फोटोशूटमुळे तिचं कौतुक झालं पण त्याचबरोबर तिला नेटीझन्सच्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. यानंतर तिनं या फोटोंवरील कमेंटचा ऑप्शन ब्लॉक केला होता.
5/ 7
ईशा गुप्ता मॉडेलिंग इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. 2007 ला मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब जिंकल्यावर ईशाला मॉडेलिंग आणि चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर महेश भट्ट यांच्या जन्नत 2 मधून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं.
6/ 7
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि ईशाच्या अफेअरची चर्चा बराच काळ चालली. या दोघांनीही उघडपणे आपल्या नात्याची कबूली दिली नसली तरीही अनेक कार्यक्रमांत दोघं एकत्र दिसले. पण नंतर अन्य कोणत्यातरी अभिनेत्रीमुळे त्यांचं नातं संपुष्टात आल्याचं बोललं जातं.
7/ 7
जन्नत 2 नंतर ईशा 'रुस्तम' आणि 'राज 3' या चित्रपटात दिसली. सात वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत ईशानं जवळपास 12 चित्रपटात काम केलं पण रुस्तम व्यतिरिक्त तिचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. याशिवाय अजय देवगणच्या 'टोटल धमाल'च्या आयटम साँगमध्येही ती दिसली.