प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'असुर' या वेबसिरीजचा दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येणर. नुकताच या भागाचं शुटींग सुरु झालं आहे. अभिनेता अमेय वाघनं सेटवरचा एक फोटो शेयर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
2/ 6
गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये 'असुर' ही वेबसिरीज आपल्या भेटीला आली होती. रहस्यमयी आणि थरारक या सिरीजने सर्वांनाचं वेड लावलं होतं. ही वेबसिरीज प्रेक्षकांना खुपचं पसंत पडली होती.
3/ 6
या वेबसिरीजच्या तुफान यशानंतर याच्या दुसऱ्या भागाची चर्चा जोरात सुरु होती. तसेच काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या भागाबद्दल सांगण्यातही आलं होतं. मात्र कोरोनामुळे कोणतीही हालचाल करता आली नव्हती. मात्र आज अखेर या वेबसिरीजच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.
4/ 6
अभिनेता अमेय वाघनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर क्लिपबोर्ड सोबत एक फोटो शेयर करत याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे.
5/ 6
'असुर' या वेबसिरीजमध्ये अभिनेता अर्शद वारसीने मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेता वरुन सोबती आणि अमेय वाघने सहाय्यक कलाकरांची भूमिका साकारली होती. या तिघांच्याही कामाचं मोठं कौतुक करण्यात आलं होतं.
6/ 6
पहिल्या सिझनमध्ये एकूण 8 एपिसोड होते. आत्ता तिथूनचं ही वेबसिरीज पुढे न्हेण्यात येईल. या भागामध्येसुद्धा अनेक रहस्ये आणि गूढ पाहायला मिळणर आहेत.