'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा आणि निशा रावलच्या वादानंतर, पहिल्यांदाच पत्नी निशाने आपले नवे फोटो शेयर केले आहेत. निशाने नुकताच आपला मुलगा काविशचा चौथा वाढदिवस साजरा केला. त्याचं क्षणांचे हे फोटो आहेत. यावेळी निशाचे खास मित्र आणि जवळचे लोक उपस्थित होते. करणला मात्र या आनंदामध्ये जागा मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी निशाने पती करणवर कौटुंबिक हिसाचाराचा आरोप लावला होता. आणि तिने याबद्दल पोलिसांत तक्रारदेखील केली होती. निशाने करणवर अनेक धक्कादायक आरोप लावले होते. मात्र करणने माध्यमांना मुल्लाखत देत या आरोपांचं खंडन केल होतं. या प्रकरणामुळे निशा आणि करण चांगलेच चर्चेत आले होते. या दोघांना काविश नावाचा 4 वर्षांचा मुलगा आहे.