2021 मध्ये अनेक 'outsiders' बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. या कलाकारांनी याआधी वू=विविध मालिकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सहय्यक म्हणून काम केलं आहे. मात्र आता हे कलाकार एका मोठ्या नावासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. यातीलच एक नाव म्हणजे श्रावणी वाघ होय. यशराज फिल्म्सच्या 'बंटी और बबली 2' मधून ही बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. यात ती राणी मुखर्जी, सैफ अली खान यांच्यासोबत झळकणार आहे. श्रावणीनं याआधी कबीर खानच्या 'द फॉरगॉटन आर्मी' या ओटीटी वरील शोमध्ये काम केल आहे.
2017 मध्ये 'मिस वर्ल्ड' किताब पटकावणारी मानुषी चिल्लर ही 'पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. यामध्ये ती अभिनेता अक्षय कुमार सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मानुषी यामध्ये राणी 'संयोगिता' ची भूमिका साकारणार आहे.
शर्ली सेटिया या तरुण गायिकेनं तरुण पिढीला अक्षरशः वेड लावलं आहे. शर्ली आत्ता अभिनयातून सुद्धा चाहत्यांच मन जिंकणार आहे. नुकताच शर्लीनं ओटीटी वर 'मस्का' चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनतर आता शर्ली एका बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. साबीर खान यांच्या 'निकम्मा' या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिच्यासोबत अभिमन्यू दस्सनी हा अभिनेतासुद्धा असणार आहे. तसेच महत्वाच म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी या चित्रपटाद्वारे तब्बल 14 वर्षांनी बॉलीवूड मध्ये परतणार आहे.