अवघ्या चाळीशीत 'या' अभिनेत्रींनी घेतला होता जगाचा निरोप; पाहा PHOTO
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली होती. मात्र वयाच्या चाळीशी पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
|
1/ 7
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली होती. मात्र वयाच्या चाळीशी पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
2/ 7
मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली होती. अनेक सुप्रसिद्ध चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अवघ्या 36 वर्षात जग सोडलं होतं.
3/ 7
पाकिजा फेम अभिनेत्री मीना कुमारी यांनी आपल्या अभिनयाने आपली एक खास छाप चाहत्यांवर पाडली होती. मात्र या अभिनेत्रीचं फक्त 39 व्या वर्षात निधन झालं होतं.
4/ 7
'दिवाना' चित्रपटामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती होय. या सुंदर अभिनेत्रीचं वयाच्या अवघ्या 19-20 वर्षातचं निधन झालं होतं. मात्र तो अपघात होता की घातपात याबद्दल अजूनही चर्चा केली जाते.
5/ 7
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पडणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. या मराठमोळ्या अभिनेत्रीने केवळ 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता.
6/ 7
'गजनी ' फेम जिया खानचा 25 व्या वर्षी मृत्यू झाला होता. तिने काम न मिळाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं.
7/ 7
दक्षिणची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सिल्क स्मिताचा वयाच्या 35 व्या वर्षी मृत्यू झाला होता.